Monday, March 04, 2019

हे बंध रेशमाचे



१.  ओळख.....

१३ फेब्रुअरी २००८ ला मी गोव्याहून मुंबईला  जायला निघालो.संध्याकाळी ६.०० वा मडगांव रेलवे स्टेशनला कोंकण कन्या एक्सप्रेस पकडायची असल्याने तशी थोड़ी धावपळच चालली  होती. १४  फेब्रुअरी २००८ ला माझ्या मित्राचे लग्न होते. आदित्य सुभेदार, सोफ्टवेअर अभियंता, वय २८ वर्षे , उंचा पुरा देह,गौर वर्ण ,पीळदार शरीरयश्ठी एकुण सर्व गुण संपन्न असा 'तो' माझा मित्र पुण्यातल्या एका सोफ्टवेअर कंपनीत लट्ठ पगाराच्या, मोठ्या हुद्द्यावर होता. कंपनी तर्फे मिळालेला पॉश बंगला, स्विफ्ट डिझायर कार, आणि त्याच्या बंगल्या समोरची भव्य अशी बाग त्याच्या 'MOST ELIGIBLE BACHELOR' च्या छबीला साजेशीच होती. गरज  होती ती फक्त एका जीवनसंगिनीची जी त्याच्या संसाराची, त्याची काळजी घेईल. तेजल सबनीस, मेनेजमेंट ग्रेज्यूएट,  वय वर्षे २५ , त्याच्या व्यक्तीमत्वाला साजेशी, गोरीपान, देखणी आणि महत्वाचं म्हणजे  स्वभावाने  सोशल, हसतमुख,एंबीशीयस अशा  मुलीचे त्याला स्थळ चालून आले.

आदित्य मुळ मुंबईचा पण त्याचे बालपण  गोव्यात गेले.  फोंडा येथील आल्मेदा हायस्कुल मध्ये आम्ही नववीत असताना आदित्य आमच्या वर्गात आला. त्याचे वडील सरकारी अभियंता होते व त्यांची गोव्यात बदली झालेली होती. आम्ही  एकाच बाकावर बसत असू. आमचे स्वभाव, आमची दोघांची आवड-निवड सारखी असल्याने आम्ही   एक मेकांचे जिवलग बनलो. अगदी एक  डबा शेयर करून  खायच्या पासून,एकाच मुलीवर क्रश होण्या पर्यंत आमची मजल गेली. कैक वेळा आमचे शिक्षक आम्हाला नवरा- बायको म्हणून सुद्धा चिडवायचे कारण  वर्गात तासाला दांड्या मारायचा आमचा क्रम सुद्धा तसा 'कॉमनच' होता. कुठल्याहि कामात  जोडप्याने भाग  घ्यायचे. जेवण-खाण, अभ्यास  ,विडयो गेम्स, क्रिकेट, आणि तास बुडवून  पाहिलेला 'आयेशा थेटर' मधला साडे-दहाचा शो सगळंच बरोबर असायचे. मागच्या बाकावर घालवलेली ती बालपणातली दोन वर्षे, ते क्षण  माझ्या आयुष्यातले काही अनमोल क्षण होते.

अरेच्या मी माझी ओळख करून द्यायला विसरलोच की! नाहीं बरोबर आहे जेंव्हा आपण कुणा इतक्या जवळच्या माणसाबद्दल बोलतो, त्या व्यक्तीशी निगडीत असलेले ते सुंदर क्षण आठवतो तेंव्हा आपण त्यांत इतके गुरफटून जातो की कैकदा स्वत:चाच विसर पडतो. अगदी तसंच आत्ता ह्या क्षणी माझं झालं आहे.असो! तर, मी विवेक नमशीकर, आय.टी. अभियंता. तसा गोव्याचाच  पण माझ्या आईचे माहेर चिपळूणकडचे . माझे आजोबा कै. विद्याधर शेणवी नमशीकर हे पोर्तुगीज काळातले गोव्यातले सुप्रसिद्ध 'प्रोफ्स्सोर' म्हणजेच प्रोफेसर. पोर्तुगीज भाषेचे प्रभूत्व त्यांच्या ठायी होते. माझे  चिपळूणचे  आजोबा कै.डॉ. प्रल्हादपंत  अभ्यंकर सुप्रसिद्ध  डॉक्टर होते. सगळ्या गावांत  त्यांचा, त्यांच्या बुद्धिमत्तेचा दरारा होता. माझे वडील शिवेश्वर नमशीकर  पणजीतल्या  'स्टेट बँक  ऑफ  इंडिया' त अकौंटन्ट च्या हुद्द्यावर असतात. माझी आई गृहिणी. लहानपणापासूनच माझ्या कोवळ्या मनावर संस्कार, आणि शिक्षणाचा ठसा बिंबवणारे माझे आजोबा होते.  त्याना  गरिबांच्या -शिक्षणासाठी, सरकारकडून दारिद्र्य रेषे खालच्या लोकाना मुलभूत गरजा उपलब्ध करून देण्यासाठी आपले उभे आयुष्य वेचताना, धक्के सहन करताना मी जवळून पहिले होते. तसा त्यांचा सहवास  मला जेमतेम वयाच्या चौदाव्या वर्षापर्यंतच लाभला. तेव्हापासूनच शिक्षकी पेशाबद्दल मला आदर होता. पुढे इंजिनियर बनल्यावर मी घरच्यांच्या आग्रहाखातर सोफ्टवेअर कंपनीत नोकरी करण्याचा प्रयत्न केला.पण, तेथील संकुचित वृत्ती, फक्त स्वत:  पुरताच विचार करण्याची वृत्ती माझ्या पचनी पडली नाही .मला ह्या सगळ्या गोष्टींचा किळस यायचा. शेवटी घरच्यांच्या विरोधाला न जुमानता आणि मुख्यत: आईची नाराजीत  सुद्धा मी माझ्या मनाचा आवाज ऐकला आणि गोव्यातच  इंजिनियरिंग कॉलेज मध्ये नोकरी पत्करली. आज मला ह्या पेशात  ५ वर्ष पूर्ण  झाली. हळू हळू आईची नाराजी दूर झाली. आपला मुलगा नोकरींत रमतो,नव्हे रममाण  होतो, त्याला समाधान लाभते म्हटल्यावर कोण आई दुखी होईल .मागच्याच वर्षी  मी 'मास्टर ऑफ इंजिनीरिंग' ची पदवी मिळवली. आज मला ह्या नोकरीत समाधान आहे,पुरेशी प्रतिष्ठा, आणि द्रव्य मिळते.एकूण मी आज समाधानी म्हणजे तुमच्या शब्दात म्हणायचे झाले तर 'सेटल्ड' आहे.

तर, मी बरोब्बर संध्याकाळी साढे पाच वाझता सगळ्या सामानांची आवरा-आवर करून कसाबसा रेल्वे स्थानकावर पोहोचलो. ट्रेन सुटायला आजून आर्धा तास होता. भारतीय रेल्वेचं  घड्याळ तास-दिढ तास मागे असल्याचं माझ्या ऐकिवात होते.तरी म्हटले ऐन वेळेस धावपळ नको जरा लवकर गेलेले बरं. प्लाटफ़ोर्म वर तशी गर्दीच होती. पेपरवाले, कुली ,शेंगदाणे वाले भैया, चहा टपरीवाले सगळ्यांच्या नजर आपल्यावर खिळवण्याचा प्रयत्न करत होते. गरीब शेम्डी पोरे, भिकारी अधून मधून सारखे फिरकत होते.त्यांची दारुण, दु:खी नझर मनाला भेडसावून सोडत होती. ट्रेन मध्ये वेळ घालवण्यासाठी काही पुस्तके बरोबर होती.लेपटोप सारख्या वस्तू मी सेकन्ड क्लासच्या  प्रवासात  टाळतो.हल्ली ट्रेनस मध्ये गुन्हेगारीची प्रकरणे वाढली आहेत. चोरी, लूट, खून असे सगळेच  प्रकार ट्रेनच्या प्रवासात  सर्रास घडत असतात. तशा बातम्या दूरदर्शनवर , वर्तमानपत्रातून रोज आपण वाचतो.एरवी मी बस प्रवास पत्करला असता पण एक तर मला कॉलेजमधून वेळेवर रजा मिळाली नव्हती व वेळी तसा फार कमी होता. बरोब्बर ६.४५ वा ट्रेन सुटली .फारसे  समान नसल्यामुळे मला माझ्या जागेवर पोहोचण्यात तशी फारशी तकलिफ झाली नाहीं. लोकांची गर्दी हि तशी कमीच होती माझ्या समोरची जागा रिकामी होती. बहुतेक आज  एकटयानेच निवांत प्रवास करायचा होता. पुढच्या स्टेशन्सवर प्रवासी ट्रेनमध्ये चढणार होते. करमळी,थीवी,पेडणे,सावंतवाडी रोड करत  ट्रेनने गोवा कधीच  मागे सोडला होता.

आता ट्रेनची गती वाढत होती तसेच माझे विचार चक्रही वेग पकडायला लागले होते. आयुष्यात प्रथमच एकटयाने ट्रेनचा सेकण्ड क्लास स्लीपरचा प्रवास घडत  होता. एरवी कुणी तरी दोस्त,सगे-सोयरे व नाहींच तर माझ्या सेकंद क्लास डब्यातले इतर प्रवासी यांच्याशी ओळख-गप्पा गोष्टी व्हायच्या. पण आज मी एकता होतो. अंधार पसरला होता. खिडकीपाशी बसून  मी मनसोक्त हवा अनुभवत  होतो. गावांत  दिवेलाग्ण्या झाल्या  होत्या.कुठे दूर माळरानातून थकले-भागलेले गुराखी जनावरे घेऊन  घरी परतत होते.मधेच निर्जन परिसर लागायचा. जीव घेणी शांतता, ट्रेनचा सारखा झुक -झूक एवढंच  ऐकू येत होतं. मी वाचण्याचा प्रयत्न केला पण आज मन थाऱ्यावर  नव्हते.बराच वेळ मी वाचण्याचा निष्फळ प्रयत्न केला. शेवटी  न राहवून पाय मोकळे करायचे ठरवले.

माझ्या बाजूच्या डब्यात एक  गोअन कॅथोलिक  परिवार बसला होता .त्यांच्या बोलण्यावरून तसे जाणवत होते .माझ्या पलीकडील डब्या  मध्ये अगदी पेसेज मध्ये काही भोजपुरी भैय्ये डफलीच्या ठेक्यावर कसेबसे गात ...नव्हे किंचाळत होते.कसा तरी  टाईमपास करत होते. काही जण पत्ते खेळत होते.जेवणाचा  वेळ झाला होता. रेल्वेच्या स्वैंपाकघरातले कर्मचारी आता लोकांच्या जेवणाच्या ओर्डेर्सप्रमाणे त्यांना  जेवणाचे पदार्थ  पुरवीत होते. मलाही भूक लागली होती. ९.०० वाजत आले होते. फेब्रुवारीतली थंडी कडाक्याची  असते व त्यांत  रेल्वे प्रवासात तर विचारूच नका. मला स्वेटर चढवायचा होता. १५-२० मिनिटांत मी  पाय मोकळे करून आलो. अक्षरश: सगळी ट्रेन फिरलो होतो.घरून निघताना आईने प्रवासात खायचा फराळ दिला होता. मला पाणी जरा जास्तच  लागते. मघाशी सारखी  घश्याला कोरड पडत असल्याने मी आर्ध्या अधिक पाण्याची बाटली संपवली होती.आर्ध्या तासात  स्टेशन येणार होते व गाडी २ मिनीट थांबणार होती त्यामुळे मला पाण्याची सोय करता येणार होती.मी फराळ घेतला.स्वेटर चढवून परत आपल्या जागी बसलो.मला जाग आली तेव्हा गाडी स्टेशनवर पोहोचली होती.'विलवडे , रत्नागिरी -महाराष्ट्र ' असा बोर्ड वाचला. प्रवासी चढत होते.मी उतरलो प्लात्फोर्मवर स्टोल होता. जवळच चहाची टपरी होती. पाण्याची बाटली घेतली, चहाचा घोट घेत ट्रेनमध्ये चढलो. पावणे दहा वाजले होते.ट्रेनमध्ये चढताच माझा फोन वाजला.आदित्यचा होता.तो फारच  चिडला होता. आज त्याची हळद होती. सगळ्या मित्रांमध्ये फक्त मीच नव्हतो.त्याचं चिडनं स्वाभाविकच होतं .कशीबशी त्याची समजूत घातली.सकाळी ५.३०-६.०० वा मुंबई CST वर मला घ्यायला ड्रायवरला पाठवतो हे त्याने बजावून सांगितले. मी हसतच होकार दिला आणि  परत माझ्या जागेवर आलो. 

जागेवर  परत येताच मी जरासा  दचकलोच.त्या जागेवर एक युवती बसली होती. बहुतेक डब्यात कोणी नाहीं असे पाहूनच ती तिथे बसली असावी.मला पाहुन ती जराशी दचकली. मीही थोडासा अवघडलो.मी विचारले तिला माझ्या जागेवर बसण्याचे कारण. पण उत्तर येईल तर शप्पत . ट्रेन आपलं पुढचं अंतर कापू लागली.मला आता टीसी येण्याची वाट पाहत राहण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता .मघाशी दचकलेली ,अवघडलेली मुलगी आत्ता कुठे भानावर येवू लागली . 
"Sorry…। took your place by mistake …. please don't call TC . I will go and take that empty seat “

असे म्हणून ती निमुटपणे खालत्या नजरेने आपलं सामान आवरत समोरच्या  रिकाम्या सिटवर बसली .तिच्या चेहऱ्यावर कसलीशी चिंतेची लकेर दिसत होती. तिचे सौंदर्य औरच होते. ती अगदीच उंचपुरी,सुडौल बांध्याची म्हणजे अगदीच zero -figure ची ललना वगैरे कुणी नव्हती .मघाशी  मी म्हणालो तिला माझ्या जाग्यावर बसलेली पाहून मी दचकलो-अवघडलो …. पण खरे तर ते अवघडणे तिच्या बोलक्या,सुबक  डोळ्यांना बघूनच असावं… तिचा गौर वर्ण,बोलके-सुबक डोळे ,नाजूकसे ओंठ, लांब सडक काळेभोर केस, उंची जेमतेम ५ फुट ३ इंच असेल,तिने परिधान केकेला पांढरा कालाबुतीचा कुर्ता व निळी डेनिम ची जीन्स… एकूणच तिची लहान मूर्ती परत परत पहावी अशीच होती . तिच्याकडे फारसं  सामान नव्हते. एक हेन्ड्बेग,एक सुटकेस बस इतकंच . दिसण्यावरून तर ती एका चांगल्या घरातली शिकलेली-अथवा शिकत असलेली जेमतेम २०-२ वर्षांची तरुणी दिसत होती .एरवी मुलींच्या फंदात न पडणाऱ्या  मला  आज का कुणास ठाऊक ह्या  मुलीबद्दल कुतूहल वाटायला लागले . तिच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव  तसा दांडगाच भासत होता .माझ्या समोरच्या सीटवर आपलं सामान आवरून ती बसली .९:०० वाजले होते. अजून आजूबाजूच्या डब्यातले प्रवासी झोपलेले नसल्याने दिवे पेटत होते.काहीतरी वाचण्याच्या हेतूने तिने आपल्या  हेन्ड्बेग मधून एक जाडजूड असे पुस्तक आणि चष्मा काढला. एवढ्या कमी वयात चष्मा लागणारे लोक एक तर खूपच शिकाऊ असतात नाहीतर टीव्ही -व्हिडियो गेम्स चे उपभोक्ते तरी असतात. पण ते जाडजूड पुस्तक मला घसा फोडून आपली मालकीण पुस्तक-कीड असल्याचे सांगण्याचा प्रयत्न करत होती. पुढचा अर्धा तास ती पुस्तकात डोके खुपसून होती आणि मी काहीतरी करून स्वत: चा time pass करण्याच्या  हेतूने मोबाईलवर "candy -crush" खेळतहोतो.

पुढचा अर्धा तास हे असंच  चालू होतं. जसे जसे लोक झोपू  लागले तसे दिवे विझू लागले . ट्रेनमध्ये मंद अंधार पसरू लागला. तिलाही बहुतेक वाचनात मन लागत नव्हते आणि मलाही. शेवटी तिने पुस्तक बाजूला सारले. रात्रीचे ९:४५ वाजले होते आणि अचानक तिचा फोन वाजला.फोनेची रिंग ऐकू येताच तिचा मघापासून चिंताग्रस्त असलेला चेहरा आणखीनच रडवेला झाला. फोनवरचा नंबर बघून तिने सरळ-सरळ तो कट केला आणि फोन स्विच-ऑफ करून जीन्सच्या पोकेटात ठेवला. आपलं  हेन्ड्बेग घट्ट कवटाळून ती खिडकीच्या कोपऱ्यात डोकं  टेकवून डोळे घट्ट  मिटून झोपी जाण्याचा प्रयत्न करू लागली. मला अस्पष्ट असे हुंदके ऐकू लागले… हळू हळू हुंदक्यांचा जोर वाढला.मला तर ह्या मुलीची दया येत होती . एक तर ती अशी एकटीने एवढ्या रात्रीची प्रवास करत होती आणि आत्ता तर तिच्या धैर्याचा बांध पार फुटला होता.तिच्या मनात कोणतीतरी गहिरी जखम होती जीच्यावरची खपली आत्ताच कुठे निघाली होती ज्याने ती चिघळली होती. काही वेळाने हुंदके कमी झाले व एक भयानकशी शांतता पसरली .स्वतःला सावरून ती आपल्या जागेवरून उठली व कदाचित washroom मध्ये गेली असेल कदचित.

रात्रीचे १० वाजले होते. सगळे लोक झोपले  होते. अधून मधून कुण्या लहान मुलाचा रडण्याचा  आवाज, कुणाच्या खोक्ण्याचा आवाज येत होता. इतर वेळेस फक्त ट्रेनची झुक-झुक व भोंग्याचा आवाज येत होत. ह्या भयानक शांततेला चिरून टाकण्यासाठी मी किशोरदांचे "रातकली एक ख्वाब में आयी और गले का हार हुइ …" गुणगुणू लागलो . माझी आई फार सुरेख गायची. तिच्याकडूनच मला हा गाण्याचा वारसा मिळाला आहे. तसा मी पट्टीचा गायक नाही परंतु संगीत माझा छंद आहे. प्रथम कडव्यानंतर कशी तंद्री लागली कळलच नाही डोळे मिटून मी गुणगुणत होतो .डोळे उघडले तर ती मुलगी माझ्याकडे पाहून मंद हसत होती. माझ्या काहीशा रटाळ गाण्याने का होईना तिला थोडेसे तरी हसू आल्याचे समाधान मला नक्कीच वाटले .तिच्या हसण्याने मनावरचे दडपण काहीसे दूर झाले. 

"you really sing well....are you into music?" तिने विचारले .

" oh is it! thanx. I am not a singer. Rather i am a bathroom singer..." मी. 

"I too like music especially old Bollywood songs. By the way i am Swati. And you?"तिने विचारले .

मी तिला माझ्याबद्दल माझ्या घरच्या लोकांबद्दल आणि मुख्य म्हणजे माझ्या आवडत्या शिक्षकी पेशाबद्दल सांगितले. काही वेळ संभाषण केल्यानंतर ती माझ्याशी जरा मोकळेपणाने बोलू लागली. आमच्या परकेपणाचे रुपांतर हळू हळू मैत्रीत व्हायची चिन्हे दिसू लागली. स्वाती खरेतर बोलकी मुलगी असल्याचे मला जाणवायला लागले. 

मला तिच्याबद्दल महिती कळली ती अशी-
स्वाती अरविंद राजाध्यक्ष, मूळ रत्नागिरीची, तिचे वडील अरविंद राजाध्यक्ष म्हणजे कृषी क्षेत्रांतील एक सुप्रसिध्द व प्रतिष्ठित नाव. स्वाती कृषी उद्योगाचे सर्वेसर्वा,गोवा-महाराष्ट्र व कर्नाटकात स्वाती अग्रो च्या उत्पादनांचा विशेष खप असतो. बी-बियाणे, कीटकनाशक, शेतीसाठी लागणारे पंप, ट्रेकटर व इतर उत्पादनांत स्वाती इंडस्ट्रीज अग्रगण्य. स्वाती ही त्यांची एकुलती एक कन्या. १२ वीत विज्ञान शाखा चयन केलेल्या स्वातीला पुढे डॉक्टर अथवा इंजिनीयर व्हावेसे वाटले नाही. तिले कला शाखेत प्रवेश मिळवला.

मराठी साहित्यामध्ये विशेष रुची असलेली स्वाती उत्तम कवियत्रीही आहे.तिने आपल्या जवळची डायरीतील काही कविता वाचायला दिल्या. विश्वासराव पाटलांचे “पानिपत” व ”संभाजी”, पु.ल.देशपांडे यांची “व्यक्ती आणि वल्ली”, “बटाट्याची चाळ” वगैरे, शिवाजी सावंतांचे “मृत्युंजय”, व “ युगंधर”, रणजीत देसाई यांचे “स्वामी” व “श्रीमान योगी” वगैरे अनेक कादंबऱ्यांवर चर्चा झाली. मलाही वाचनाची जबरदस्त आवड व भूक असल्याने तिच्याशी चर्चेत सामरस्य साधायला फारसा वेळ लागला नाही. कविता-कथा, कादंबरी पासून सुरु झालेली चर्चा मराठी चित्रपटापर्यंत व तेथून मग हिंदी व हॉलिवूडच्या दालनात सुद्धा पोहोचली. मी सुद्धा श्रीकृष्णांवर आधारित काहीतरी लिहिण्याची चेष्टा करत असल्याचे कळल्यावर मला- “ तूला कला क्षेत्रात इतकी रुची असून सुद्धा अभियांत्रिकी क्षेत्र का निवडलंस?” असा सडेतोड शेरा मारायला सुद्धा तिने मागेपुढे पाहिले नाही. थोडक्यात,गप्पा-गोष्टीच्या नादात रात्र केव्हा सरली आम्हाला कळलेच नाही. पहाटे केव्हा तरी मला झोप लागली.

फोनच्या अलार्मने बरोबर साढे-सहा वाजता मला जागवले. मी जेव्हा जागा झालो तेव्हा माझ्या व्यतिरिक्त माझ्या आसपास कुणी नव्हते. माझी नजर स्वातीचा वेध घेऊ लागली. ती आपल्या जागेवर नव्हती. तिचे सामानही तिथे नव्हते. मला न सांगता स्वाती कशी काय जाऊ शकते असा प्रश्न मला पडला. तिने मला रात्री सांगितले होते की ती मुंबईत आपल्या एका मैत्रिणीकडे जात होती. का? हा प्रश्न मी विचारला नाही आणी विचारावेसेही वाटले नाही.पण एक प्रश्न जरूर पडला होता- “करोडपती बापाची ही कन्या सेकंड-क्लास ट्रेनने एकटी रात्रीचा प्रवास कशी व का करते?” मी माझ्या जागेवरून उठलो व इतर प्रवशांशी चौकशी करण्याचे ठरवले.

बाजूच्या डब्यात बसलेल्या गोअन कॅथोलिक परिवाराकडे विचारणी करण्यास गेलो असता त्यातील जाड्या काकू माझ्यावरच कोकणीतून खेकसल्या-“ तू कितें मोदेला रें!! रात भोर तुमी फोदोळ घातला आणि इतो सोक्काणी आम्गे न्हीद इबाड्पाक येयला?? तुगे फास्की वेतना आपले बेग मुज्या तोक्लेक आदळून गेले. आनी आता मातशी म्हाका न्हीद पोट्टा शी दिस्तली तेन्ना तू जुदेव आयलो जीव हावपाक. माल्कीर्याद खोइंचो !!!” तिच्या खेकसण्याने मी बावरलोच पण इतर प्रवासीही दचकून जागे झाले. सर्वांच्या नजरा जणू मी प्रत्यक्ष ‘क्रूरकर्मा‘ कुठलातरी असुर ज्याच्या पापाचे घडे भरले आहेत व ते स्वत: असुरांतक देव-देवी असल्यासारख्या माझ्यावर खिळल्या

त्यातल्या एका महिषासुरमर्दिनीने तर  

“you pervert! Why are you troubling the lady? Get lost now or else we will call police!” 

असाही मला दम दिला. शेवटी त्या ख्रिस्ती काकूंच्या यजमानांनी आपणहून पुढाकार घेऊन त्या सर्वांना शांत केले व माझ्याशी शांत वृत्तीने सौंवाद केला. मी त्याला माझ्या तिथे येण्याचे कारण सांगितले. मी फक्त काळजीपोटी स्वातीची चौकशी करण्यासाठी आल्याची खात्री पटताच त्याच काकूने मला प्रेमाने सांगितले-

“चोल्या हायेन तुका ओळ्खोपाक चूक केली. तें चेडू फाटल्या स्टेशनाचेर देवला.”

स्वाती मागच्या स्टेशनवर उतरल्याचे मला कळले. कदाचित झोपलेला बघितल्याने तिला मला उठवणे रास्त वाटले नसावे. असो. मी माझ्या जागेवर आलो छत्रपती शिवाजी स्टेशन काहीच मिनिटात येणार असल्याने मी सामानाची आवराआवर सुरु केली. इतक्यात माझी नजर खाली फरशीवर गेली. एक कागद पडलेले होते. मी ते उचलले. त्यावर लिहिले होते-“तुझी प्रवासातील सोबत मला फार आवडली. पुन्हा भेटू.” व त्या खाली तिने आपला फोन नंबर लिहिला होता. मी ते कागत उचलले व व्यवस्थितपणे माझ्या जाकीटच्या आतल्या कप्प्यात ठेवले. एव्हाना ट्रेन स्टेशनवर पोहोचली होती. आदित्यचे दोन मिस्ड कॉल्स पण मिळाले. मी लागलीच त्याला पोहोचल्याचा मेसेज पाठवला. स्टेशनवर त्याचा ड्रायव्हर माझ्यासाठी थांबला होता.माझे समान गाडीत घालून आम्ही निघालो.

स्टेशनपासून ४५ मिनिटाच्या अंतरावर आदित्यचा बंगला असल्याचे ड्रायव्हरकडून समजले. मी लागलीच घरी बाबांना फोन करून मी पोहोचल्याचे कळविले. आता माझ्या डोक्यात स्वतीचेच विचार होते.सहज म्हणून मी तिच्या दिलेल्या नंबरवर मेसेज पाठवला-

“पोहोचलीस व्यवस्थित? तुझ्यामुळे प्रवास छान झाला.संपर्क ठेव व काळजी घे  - विवेक .” 

प्रतिसाद आला नाही. कदाचित ती व्यस्त असेल अथवा मोबाईल पर्समध्ये साईलंट असेल. असे वाटले....


२. भेट.....

आदित्
प्रशस्त बंगल्यासमोर गाडी थांबली. ड्रायव्हरने माझे समान उतरवले व मला आत जाण्यास सांगितले.आदित्यचा बंगला अत्यंत प्रशस्त होता. अत्यंत आकर्षक विद्युत सजावट केलेली होती.घरात बरीच मंडळी होती.ह्या सगळ्या वर्दळीत आदित्यला, त्याच्या आई-बाबांना शोधणे मला आव्हान वाटू लागले.मी आदित्यला कॉल केला.मला भेटण्यासाठी तो लागलीच माडीवरून खाली आला. लग्नाचा मुहूर्त १२.३० चा होता. आत्ताच कुठे आठ पावणे आठ वाजले होते. तो नुकताच आंघोळ करून आला होता. आदित्यने मला बघतच घट्ट मिठी मारली. त्याच्या आई-बाबांनाही आनंद झाला होता.मी त्यांचा आशीर्वाद घेतला.त्यांनी नोकरांना माझे समान वर रूममध्ये नेण्यास सांगून माझ्या प्रवासाबद्दल विचारपूस केली.चहा-नाश्ता करून मी फ्रेश व्हायला रूममध्ये आलो तेव्हा माझ्या मोबाईलवर दोन मेसेज बघितल्या.
पहिला मेसेज-

“ पोहोचले.तू पोहोचलास का?तुझा मित्र भेटला?संध्याकाळी कॉल करते.मस्त मजा कर.आणि....काळजी घे. ;) “. 

असा होता. दुसरा जरा विचित्रच होता- 

“प्लीज़....मला पुन्हा कॉल करू नकोस.मला फसवलेस तू. I hate u.”

तिच्या ह्या दुसऱ्या मेसेजने मी तर आगदी चक्रावूनच गेलो. मी हिला फसवले? केव्हा व कसे? माझं डोकं चक्रावू लागलं. इतक्यात परत मेसेज आला – 

“oops!!... sorry wasn’t for u…will cal u in the eve. TC. ”

मला तर काहीच कळेनासं झालं होतं. असो आज आदित्यला सर्वांत प्रथम प्राधान्य दिले पाहिजे.स्वातीचा विचार थोडा बाजूला ठेवायला हवा असे वाटले. मी आंघोळ-कापडे करून खाली गेलो. आदित्यच्या लग्नविधींची तयारी चालली होती. त्याच्या मित्र-मैत्रिणींशी ओळख झाली. मीही त्यांना हातभार लावला.

आम्ही आदित्यला तयार करून बोहल्यावर चढवला. तेजल बोहल्यावर येताच माझी तिच्याशी ओळख करायला आदित्य विसरला नाही. लग्नविधी झाली,गळ्यात मला पडल्या ,फेरे झाले. जेवण उरकली आणि लोक आदित्य व तेजलला आशीर्वाद व शुभेच्छा द्यायला स्टेजवर येऊ लागले. मी त्याच्या जवळच थांबलो होतो.आदित्यकडे आलेली माणसंही तशी भारदस्त होती. त्यामध्ये नगराध्यक्ष, मंत्री-संत्री, मंत्रालयातल्या बड्या असामी, मोठमोठे उद्योगपती होते. आदित्यच्या बाबांच्या व खुद्द त्याच्या ओळखीही जबरदस्त होत्या. तेजलवैनींच्या घरचे लोकही तसे कमी नव्हते.संध्यकाळी लग्नविधी उरकून आम्ही आदित्यच्या घरी परतलो. आज रात्री उशिरापर्यंत तरी कुणीच झोपणार नव्हते. अंताक्षरी,नव वधु-वर यात शामिल होणार होते. दुसऱ्या दिवशी सकाळी सत्यनारायण पूजा होती व मी पूजेच्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळच्या ट्रेनने गोव्यात परतणार होतो.


तर लग्नकार्य उरकून आदित्यच्या घरी परतल्यावर मी आपल्या रूममध्ये आलो. काल रात्रीचा ट्रेन प्रवास व आज सकाळपासून केलेले काम यामुळे माझी नुसती दमछाक झाली होती. शोवरखाली डोळे मिटून शांत बसलो. कढत पाणी माझ्या शरीरावरून वाहत होते आणि माझा शीण काहीसा दूर होत होता. आंघोळ करून मी प्रथम घरी आई-बाबांना फोन लावला व क्षेमकुशल कळवले. संध्याकाळचे पावणे-सहा वाजले होते व जरा पाय मोकळे करण्यासाठी मी आदित्यच्या घरातून बाहेर पडलो (अर्थात त्या लोकांना कळवूनच). त्याच्या घरचा रस्ता ओलांडून बगलच्या पार्कात गेलो.एका गुलमोहोराच्या झाडाखाली बाकावर बसलो. वाऱ्याची मंद झुळूक मनाला सुखावत होती. इतक्यात माझा फोन वाजला. स्वाती चा होता. का कुणास ठाऊक माझ्या मनात एकदम नवचैतन्यच संचारले.आणि मी फोन उचलला-


“ गुड इविनिंग विवेक. कसे झाले लग्न ?” स्वाती.

“गुड इवेनिंग!! लग्न अगदी झक्कास पार पडले. आदित्य खूप खुश झाला मला पाहून.आत्ताच घरी पोहोचलेत सगळे. फ्रेश होऊन मी आत्ताच बाहे पडलोय हवा खायला “ मी.

“छे... काय रे नुसती हवाच खाणार का? कॉफी पिणार माझ्यासोबत?” स्वाती.

“काय?? पण कसं शक्य आहे. एक तर तुझा पत्ता मला माहित नाही व मुंबईत मीही तसा नवीनच आहे. कसे भेटणार आपण?” मी.

“ बरं मी तुला एक पत्ता फोरवर्ड करते. ऑटोरिक्षात बस व ह्या पत्त्यावर ये. ओके.... भेटूया मग....” स्वाती.


फोन ठेवला. व एक विचार सहज मनात डोकावू लागला- “काय डेरिंगबाज पोरगी आहे. रात्रीचा ट्रेनने एकटा प्रवास काय करते! अनोळखी मुलाशी मैत्री काय करते आणि आत्ता! चक्क कॉफी???”

पत्ता होता- अन्नपूर्णा कॉफी हाउस, आयुर्वेद महाविद्यालयाजवळ,लेन नंबर ३.

मी ऑटोरिक्षा पकडली व जेमतेम २० मिनिटात गच्च गर्दीतून वाट कढत मी कॉफी हाउस समोर पोहोचलो. रस्ता ओलांडून कॉफी हाउसच्या पायऱ्या चढून आत प्रवेश करताच माझी द्रुष्टी तिच्यावर पडली.आज तिने पिवळ्या रंगाचा सलवार परिधान केला होता. एकूण तिची छोटीशीच पण आकर्षक मूर्ती अजून आकर्षक वाटत होती. तिच्या चेहऱ्यावर एक विलक्षण तेज, तजेलपणा होता. मला पाहून ती छान हसली. मी तिच्या समोरच्या खुर्चीवर बसलो. आमच्यामध्ये त्या दिवशी जवळजवळ एक तास गप्पागोष्टी चालल्या होत्या. आम्ही कॉल्ड कॉफी व चीज सेंडविच मागविल्या त्या दिवशी ‘हाय-हेलो’ वरून सुरु झालेले आमचे संभाषण एकमेकांच्या आवडी-निवडीपर्यंत पोहोचले. गप्पागोष्टी, हास्यविनोद असा मैत्रीसाठी आवश्यक असलेला एक-एक टप्पा ओलांडत आता चर्चेने गंभीर असे वळण घेतले.

कॉफी हाउस मध्ये आम्हाला बोलता बोलता वेळ कसा गेला कळलेच नाहीं एव्हाना संध्याकाळचे साढे सात वाजले होते.कॉफी हाउसमध्ये गर्दी वाढत होती.कामावरून थकून भागून येणारे लोक चहासाठी ताटकळत उभे होते व कुणाच्या तरी उठण्याची वाटच पहात होते. मला तात त्यांची दया येत होती. तिच्या बोलण्याकडे माझे लक्ष नसल्याचे जाणवताच तिने विचारले- “काय रे कुठे लक्ष आहे तुझे? माझ्या बडबडीचा कंटाळा आलाय वाटतंय....”

“छे ग कंटाळा कसला उलट मोकळं वाटतंय आज.मी फक्त ही दारावरची गर्दी पाहून जरा विचलित झालो एवढंच. थकून-भागून कामावरून आलेली माणसे बसण्याच्या जागेसाठी ताटकळत उभी आहेत....” - मी.

तिलापण त्या सगळ्यांची दया आली व मला म्हणाली, “मला वाटतंय इथून निघालेलं बरं. तुला लवकर पोहोचायचंय का आदित्यकडे?”

“नाही ग. मी खरं तर त्यांना सांगूनच बाहेर पडलोय. आज काही त्यांच्याकडे कुणी लवकर झोपायचे नाही.उशीर झालच तर कळवेन मी.” मी म्हणालो. खरंतर मलाच तिचा साथ हवा-हवासा वाटायला लागला होता.


कॉफी-हाउसमधुन आम्ही बाहेर पडलो. महाविद्यालयाच्या पलीकडे असलेल्या उद्यानात गेलो. आता थोडीशी थंडी वाजत होती.पण तिच्या सह्वासात मला त्या थंडीची तमाच नव्हती. मघाशी चालत असलेले आमचे काहीसे ‘गंभीर’ संभाषण पुन्हा सुरु झाले.


“ विवेक! एक विचारू?” -ती.

“विचार ना !” –मी.

“ कधी निघालास परत गोव्याला?” -ती

“परवा दुपारच्या ट्रेनचचे तिकीट बुक केले आहे. २० फेब्रुवारीपासून नवा सेमेस्टर सुरु होतो आहे त्यामुळे जराशी धावपळच झाली आहे.” -मी.

“मी पण परत चिपळूणला जायचे म्हणतेय. कसं असत बघ ज्याच्यासाठी आपले घर, आपली माणसे, इतकेच काय आपल्यावर माया करणारी आपली जन्मदात्री आईची मायाही सोडली, ज्याच्याकरिता मी मुंबईत आले, तोच मुळी प्रेम करायच्याही काय पण नुसती मैत्री ठेवायच्याही लायकीचा राहिलेला नाही. घरातून आई-बाबांशी लढून बाहेर तर पडले आधार होता तो फक्त ‘अलीचा’.......” बोलताना तिचा कंठच मुळी दाटून आला.

‘अली’ हे नाव ऐकताच काळजात ‘ढस्स’ झाले. पुढचा सगळा चित्रपट कसा असणार ह्याची मला जरा जाणीव झाली. एकता कपूरचा निस्सीम भक्त असल्याने माझ्या डोळ्यासमोर आता ‘daily soap’ चे एक-दोन नव्हे चांगले २०-२५ एपिसोडस आले. त्या मालिकेची मुख्य नाईका आमची स्वाती राजाध्यक्ष होती आणि जीन्स व चामड्याचे बूट घातलेला त्यावर आखूड चामड्याचे जाकीट घातलेला, डोळ्यांत काजळ घातलेला, केसांच्या मधोमध शेतातली पायवाट असल्यासारखा भांग पाडलेला. मारवाड्यासारखे लांबसडक केस रंगवलेला, गोरेपान,थोडीशी वाढलेली दाढी ठेवलेला असा कुणीतरी ‘अली मुहम्मद’ अथवा ‘अली कासीम’ असा इसम ज्याची एंट्री पहिल्या दोन एपिसोडपर्यंत नायकाची,हवीहवीशी वाटते, पण नंतर जसजशी मालिका पुढे जाते तेव्हा ह्या अलिबाबाचा खरा मुखडा समोर येतो. एकतर त्याच्या दोन-चार बेगमा आधीच असतात नाहीतर तो पैशासाठीच नायिकेचा गैरफायदा घेतो.असो.

स्वातीचे हुंदके काही केल्या थांबत नव्हते.मी जवळच असलेल्या एका आईसफ्रूटवाल्याच्या गाड्यापर्यंत धावत गेलो व एक सोफ्टी घेवून तिच्याकडे परतलो. तिच्या हातात सोफ्टी देऊन तिला बाकावर बसवले.माझा रुमाल तिचे डोळे पुसण्यासाठी दिला.पण दुर्दैवाने तिने त्याचा टिशू पेपरसमान उपयोग केला.आपल्या नाकापाशी नेत जोरात स्स्सू करून परत माझ्या हाती देण्यासाठी आपला हात पुढे केला.मी त्या रुमालाच्या एका कोपऱ्याला चिमुट मारून तो तिच्याकडून घेतला. स्वाती आत्ता तरी त्या अलीबाबत काही सांगते का ह्या भावनेने मी पुढचे जवळजवळ १०-१५ सेकंड तिच्याकडे पहात होतो आणि नकळत तिच्या गहिऱ्या डोळ्यात केव्हा हरवलो काहीच कळले नाही....तिने आपली कर्मकहाणी सांगण्यास सुरुवात केलीही असेल पण माझा रिसिव्हर केव्हांच ऑफ झालेला. माझा सॉफ्टवेअर प्रोग्राम तिचा डोळ्यातच "hang" झालेला असल्याने तिच्या पुढील "inputs " तो घेऊ शकत नव्हता .आत्ता जोपर्यंत ती (control +pause )चे “keyboard configuration” स्वतःहून 'type' करत नाही तोपर्यंत माझा सॉफ्टवेर प्रोग्रॅम असाच ताटकळत राहिला असता.

मला शुद्ध आली ती स्वातीच्या हसण्याने! मी आपला मुर्खासारखा तिच्यात इतका हरवलो होतो कि त्यामुळे स्वातीने अलीबद्दल काय सांगितले किती वेळ सांगितले कशाचेच भान राहिले नाही.शुद्धीत येताच मात्र मी माझ्या बावळटपणावर शरमलोच ."मुलगी" ह्या विशेषणाला दुरूनच पाहत आलेलो मी आज प्रथमच कुठल्याश्या अनोळखी मुलीबरोबर कसा काय मिसळलो आणि कसा नकळत तिच्या अल्लड्पणावर भुललो, तिच्या निरागसपणात गुंतलो माझे मलाच कळले नाही. एकतर माझ्या ह्या गुपिताचा भोपळा तिच्यासमोर धप्पकन फुटलेला व अजून गमतीशीर गोष्ट म्हणजे तिने मला परत केलेला तोच रुमाल पकडून माझ्या नकळतच माझेच हात माझ्या कपाळावरच्या घर्मबिंदूंना पुसत होते !! कर्मभोग !!!दुसरे काय..पण ह्याच मुळे एक चांगली गोष्ट नक्कीच घडली होती ......तिच्या चेहऱ्यावर नुसतेच हसू नव्हे तर खळखळणारा हश्या पिकला होता.

हरखलेला मी आपली पडती बाजू सावरायच्या घाईत परत बावळट्पणे बोललो-" Sorry! I was just lost in my own thoughts...." काही क्षणांच्या पॉसनंतर मात्र मीही स्वतःला रोखू शकलो नाही. आम्हा दोघांच्या हास्यगंगेत त्या "अलीचे" पिंड मात्र कधीच वाहून गेले होते...कधीही न परतण्यासाठी.


३. चलबिचल......

रात्री पावणे दहाच्या सुमारास मी स्वातीला तिच्या मैत्रिणीकडे पोचवून आदित्यच्या घरी पोहोचलो. रात्री उशिरापर्यंत त्यांच्यासमवेत मौज-मजेत सामील झालो आणि झोपी गेलो. 

पहाटेचा  गारवा  खोलीत शिरला. जवळच बागेत फुललेल्या चाफ्याच्या मधुर गंधाने मला जाग आली. त्या गंधाबरोबर मला रात्री भेटलेल्या त्या चाफेकळीचेही स्मरण झाले. अजूनही बाहेर काळोख होता. घड्याळात नुकतेच पावणे पाच वाजले होते. रात्री उशिरापर्यंत आदित्यची नातेवाहिक मंडळी भेंड्या ,गाणी ,थट्टा-मस्करी करून मध्यरात्रीनंतर झोपी  गेले होते.आज सकाळी सत्यनारायण पूजा असल्यामुळे काकू मात्र भल्या पहाटेच किचनमध्ये होत्या.मलाही आज पूजेसाठी हातभार लावायचा असल्याने मी मुखमार्चन करून आंघोळीसाठी तयारी करण्यात गुंतलो. आंघोळ उरकून मी खाली उतरलो. काकूंना पूजेच्या कामात मदत केली. बरोबर ८ वाजता माझ्या मोबाईवर मेसेज आला. स्वातीचा असेल म्हणून मीही तो वाचला -
" Good Morning!! आज तू खूप बीजी असशील म्हणून सकाळीच मेसेज केला. पूजा संपल्यावर फोन कर. तुझ्यासाठी सरप्राईझ आहे!"

सरप्राईझ !! काय असेल बुवा? अली तर आला नसेल !!! छे  छे !! असं होता काम नये . माझ्या  पोटात भीतीचा गोळाच उठला. सरप्राईझ जीवघेणे नसले तर मिळवलं.. सर्व काही त्या सत्यनारायणावरच सोपवून अत्यंत मनोभावे मी पूजेची तयारी करू लागलो.

पूजा झाली, जेवणे उरकली , पाहुणे-पाहुणचार,देणे-घेणे झाले आणि आत्ता कुठे आदित्य व तेजलला थोडासा विसावा भेटला. घड्याळावर संध्याकाळचे साढे-चार वाजले. घरातील मंडळी पंगू लागली आणि भल्या पहाटेपासून कामाला जुंपलेली नातवाहिक मंडळी आपापल्या खोलीत विश्रांतीसाठी जाऊ लागली. मलाही थकवा जाणवत होता.पण  "Anxiety" मला स्वस्त बसू देत नव्हती. कधी एकदा स्वातीला कॉल करतो असे झाले होते. 

मी तसाच वरती खोलीत आलो. गार पाण्याचा शॉवर घेतला व पलंगावर स्वतः:ला झोकून दिले. आता परतीच्या वाटेवर डोळे लागले होते. आई बाबांना भेटणार असल्यामुळे आनंद तर झालाच होता पण का कुणास ठाऊक जीवनातील एक अत्यंत महत्वाचा दुवा हरवेल का ह्याची भीतीही वाटत होती. न राहवून मी स्वातीला कॉल करणार इतक्यात खोलीच्या बाहेरून आदित्यने हाक मारली व मी भानावर आलो. दार उघडले तर दारात आदित्य व तेजल वाहिनी उभ्या होत्या. मी हसतच त्यांना आत बोलावले.-

"अरे यार तुझ्याच घरात परवानगी काय मागतोस ! ये आत .या वाहिनी ." मी.

"शी ...वहिनी काय तेजल म्हणा  . तसेही  मला तुम्ही कुठे अनोळखी आहात ? तुमचे मित्र तर  तुमच्याच गोष्टी करत असतात ." तेजल.

"काय रे ? काय सांगितलेस लेका माझ्याबद्दल !!" मी हसतच .

"काही नाही लहानपणीचे आयेशा थियेटर चे व इतर  काही प्रसंग आणि....." आदित्य मध्येच थांबला.

" आणि....अजून काय ! सांग ना !" मी न रहावून.

"तुझी लव्हस्टोरी ...." आदित्य न राहवून हसत म्हणाला.

मला काळजात अगदी धस्स झाल्यासारखे वाटले. या लेकाला स्वातीबद्दल काही कळले तर नसेल? मुळात मीच अजून स्वातीला तसे काही व्यक्त केले नाही...मग ह्याला कसे कळले?
नकळत माझ्या कपाळावरून घाम ओघळला. माझी डळमळीत मुद्रा पाहून त्या दोघांना अजूनच हसू फुटले....

"हां!...तुझे पुस्तकप्रेम !....का?? अजून कोणी आहे का? " आदित्यचा खोडकर स्वर.

आम्ही तिघेही मनसोक्त हसलो. मी म्हणालो -

"अरे तसं  काही कन्फर्मड असेल तर सर्वांत आधी तुला नाही का मी सांगणार?" मी.

"कन्फर्मड म्हणजे हो?....इन प्रोसेस काही आहे का?..." तेजल थट्टेच्या स्वरात म्हणाली.

"नाही हो जाऊ द्या ना तो विषय. अजून मास्टरर्स व्हायचंय मला. ह्या वर्षी प्रवेश घेणार मी. त्यानंतर लग्नाचं."
मी निर्धाराने म्हणालो खरं  पण आतून माझेच  हृदय मलाच  विचारू लागले -" खरंच!!!!! बघ हं !! नंतर विचार बदलशील ."

असो. त्यानंतर आम्ही पुढचा अर्धा तास पुष्कळ गप्प-गोष्टी केल्या. मी त्यांना गोव्यात येण्याचे   आमंत्रण दिले. तेजलने माझ्यासाठी आणि आई-बाबांसाठी काही भेटी आणलेल्या त्या मी ठेऊन घेतल्या.आणि आमचा दोघांचा निरोप घेऊन ती खोलीबाहेर गेली.

आता आदित्य आणि मी दोघेच होतो. माझ्या आयुष्यातील सर्वांत जवळचा मित्र असल्याने माझ्या चेहऱ्यावरचे भाव त्याने कधीच ओळखले होते. त्याच्या मनात संशयाची पाल कधीपासूनच  चुकचुकत होती . फक्त तेजलमुळे तो गप्प बसला होता. ती गेल्यावर मात्र त्याने खोलीचे दार लावले व सरळ माझ्या कानाला पकडत तो म्हणाला-
"काय रे पट्ठ्या....कोणाला टेपा लावतोस तू ? मला! अरे तू स्वतःलाही जितकं  ओळखणार नाहीस तितकं तुला ओळखतोय मी. सांग काय भानगड आहे !! कुठे होतास काल संध्याकाळी ?? " आदित्य म्हणाला.

कानातून निघणाऱ्या वेदना असह्य होऊन मी ओरडलो - " आ .....सोड...सांगतो....सर्व सांगतो..."

त्यानंतर मी ट्रेन मध्ये घडलेल्या सर्व प्रकारापासून काळ रात्री घडलेल्या गोष्टींची इत्यंभूत माहिती त्याला दिली.

स्वातीची माहिती कळताच दचकून आदित्य म्हणाला -

"काय ??? राजाध्यक्ष इंडसट्रीज??? स्वाती ऍग्रो !!! अरे तेजलच्या कम्पनीच्या मालकाची मुलगी आहे ती !! दोन दिवसापासून बेपत्ता आहे घरून. अत्यंत मोठी असामी आहे तिचे वडील अरविंद राजाध्यक्ष. त्यांची राज्याच्या तसेच देशाच्या उच्चवर्णियांमध्ये गर्ती होते. ऍग्रो  इंडसट्रीव्यतिरिक्त त्यांच्या शैक्षणिक संस्थाही चालतात. R.R.I.T चे नाव ऐकले असशीलच ना ? 'रावसाहेब राजाध्यक्ष इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजी' ह्या विश्व् विद्यालयाच्या एकूण १५ अभियांत्रिकी आणि २ वैद्यकीय कॉलेजीस महाराष्ट्रात आहेत. एकूण ...तू फार किमती मासळी आपल्या जाळ्याला अडकविण्याचा प्रयत्न करतोस."

काही क्षण असेच गेले. आदित्यने माझ्या डोळ्यातले अश्रू टिपले आणि मला खांद्यापाची घट्ट पकडून गदागदा हलवत तो म्हणाला -

" विवेक...मी हे सगळे तुझा निरस करण्यासाठी अथवा तुज्या भावनांना ठेचाळण्यासाठी सांगत नाहीए . पण मला तुझी काळजी वाटते म्हणून कोणतेही पाऊल टाकण्यापूर्वी तुला तुझा कोणाशी सामना आहे हे समजण्याकरिता हि माहिती दिली. पुढचा फैसला तुझाच आहे. मात्र अजूनही तुला तुझ्या प्रेमावर ठाम विश्वास असल्यास इथून पुढे  कुणी  तुझा साथ देवो अथवा नाही , मी मात्र सदैव तुझ्या पाठीशी ठामपणे आहे."

भावनांच्या आवेगाने मी आदित्यला घट्ट मिठी मारली.काही क्षणांनी मी स्वतःला सावरले व खिन्नपणे हसतच म्हणालो-
" काय मनाचे एक-एक खेळ असतात पहा. अजून मला  तिला माझ्याबद्दल काही वाटते आहे का? हेही माहित नाही. आमची ओळख ती एका दिवसाची. त्यात तो कोण कुठला 'अली'...त्याच्याबद्दलही काही माहित नाही. काल रात्री तिच्या डोळ्यात हरवलो तेव्हा भविष्याची काय-काय स्वप्न माझ्या वेड्या मनाने पहिली !! सगळे मृगजळ होते...मला माझ्या मनाला समजावले पाहिजे." मी बिछान्यावर बसलो.

आदित्य बोलला -
"बरं ...ते सगळं पुढे  पाहून घेता येईल तूर्तास थोडा आराम कर. रात्री भेटू." असे म्हणत आदित्य खोलीबाहेर गेला.

खरे तर स्वातीला फोन करण्याची फार इच्छा  जाणवत होती पण कुठेतरी माझ्याही मनाला ब्रेक लावायला हवा होता. कितीही झाले तरी मी एक सामान्य शिक्षक .मी काय देणार तिला तेच ऐश्वर्य व राजेशाही राहणीमान ?

माझ्या मनात अनेक विचारांची चलबिचल चालू  झाली...
१. स्वातीलाही माझ्याबद्दल काही वाटत असेल का?
२. जर खरेच तसं असेल तर तिच्याशी लग्न करण्यास माझ्या घरच्यांची व तिच्या घरच्यांची परवानगी मिळेल का?
३. तिच्या मनात अजूनही 'अली ' असला तर ?
४.उद्या मी परत जाणार त्यानंतर आमची भेट होईल ? ....
५. काय असेल स्वातीचे सरप्राईझ ?? वगैरे...

कालपासून माझा मोबाईल चार्ज केलाच नव्हता आणि आत्ता तर तो चक्क बंदच पडला होता. चार्जिंगला लावून मी पाठ बिछान्यावर टेकवली व नकळतच....निद्राधीन झालो.


४. 

जाग आली तेव्हा रात्रीचे ८.०० वाजले होते. एकदम मला मोबाईलची आठवण झाली.पटकन चार्जिंगला लावलेला मोबाईल घेतला आणि स्विच-ऑन केला. स्वातीचे एकूण ८ मिस्ड कॉल्स होते!! अजून चार मॅसेजीस पण होत्या. माझे काळीज धडधडायला लागले. तिचे एकेक मॅसेज वाचायला लागलो -
१. "काय रे पूजा संपली का?"   वेळ -५:२५ 
२."भेटू शकशील ?सरप्राईझ आहे तुझ्याकरिता "   वेळ - ५:३० 
३."हॅलो...अरे रिप्लाय का करत नाहीस? थकलायस का? " वेळ - ६:१५

त्यानंतरचा  शेवटचाच मॅसेज ७:३० वाजता आला होता -

४. " वाटलं होतं  एक मित्र भेटला.पण  तुला माझ्याशी मैत्रीचं नको असेल तर तसे सांग तरी. वाटलं होतं उद्या दुपारी तू गोव्याला परत जाशील आणि त्यानंतर कधी आपली प्रत्यक्ष भेट होईल न होईल म्हणून एकदा परत तुज्याशी भेटावं. पण ठीक आहे तुही बिझी असशील आवराआवर करण्यात.काळजी घे "  

तिसऱ्या मेसेजनंतर लागोपाठ ८ कॉल्स होते. काहीतरी काळंबेरं नक्की आहे.तिलाही मला भेटावसं वाटतं .भविष्यात माझी प्रेयसी होईल की  नाही माहीत नाही पण एक चांगली मैत्रीण मात्र मी गमावून बसेन अशी भावना मनात निर्माण झाली. तिचे वडील अब्जाधीश कि काय ते असले म्हणून तिचा काय दोष ?? नाही...जाण्यापूर्वी निदान एकदा तिला भेटायलाच हवे असा दृढ निश्चय मी मनात केला.


Monday, February 15, 2016

गुरु सांगाती

तस्मै श्री गुरवे नम:



संध्याकाळचा मंद वारा त्या बकुळीच्या फुलांचा सडा डोहाच्या नितळ व शीतल पाण्यात पाडत होता. बकुळीच्या त्या फुलांचा गंध साऱ्या माळरानात पसरलेला होता. घरट्यात परतणाऱ्या त्या चिमण्यांचा चिवचिवाट जणू मधुर स्वरांच्या गायिकांनी छेडलेला साजच वाटावा इतका कर्णमधुर वाटत होता. सूर्यनारायण अस्ताच्या वाटेवर होते. त्यांच्या रथाला जुंपलेल्या घोडयांच्या टापांमुळे आकाशात चौफेर गुलाल उधळला होता. हवेत आता थोडासाच पण हवाहवासा गारवा जाणवत होता. जवळच असलेल्या साईमंदिरातील कळसावरची पताका डौलाने फडकत साईबाबांची थोरवी आळवित होती. त्या पताकेचा धर्मही कोणता? मानवतेचाती ना हिंदुसारखी भगवी होती ना मुसलमानांसारखी हिरवी. तिच्या त्या सुवर्णकांतीवर सूर्यकिरणे पडून ती आता सोन्याच्या दागिन्याप्रमाणे भासत होती. ज्या अनंतकोटी ब्रह्मांडनायकाने लोककल्याणार्थ पांढरी फाटकी कफनी आयुष्यभर धारण केली त्या हिऱ्यासमोर त्या पताकेचे तेज मात्र पार फिके भासत होते.

अशा चैतन्यमय वातावरणात एक व्यक्ती मात्र स्वतः भोवती दुःखाची काळीकुट्ट भिंत उभारून स्वतःमध्येच हरवलेली होती. त्या डोहाच्या पाण्यात स्वतःचे प्रतिबिंब पाहत डोळ्यातून अश्रू गाळत होती. बाहेरचे वातावरण शांत असूनही त्या व्यक्तीच्या मनात मात्र दुःखाचे वादळ उठले होते. चेहऱ्यावर वाढलेली दाढी-मिशी, डोळ्याभोवतीची काळी वर्तुळे, निस्तेज डोळे, सुकलेले ओंठ,  कासनुसे वाढलेले केस ह्यामुळे जेमतेम 22 वर्षांचा असूनही तो तरुण पस्तिशीतला दिसत होता. त्याच्या अंगावरचे कपडे पाहून तो कोणी चांगल्या घरातला तरुण असल्याचे जाणवत होते. कित्येक दिवस तो असाच भटकत होता. त्याच्या पोटात अन्नही नव्हते.

केदार तसा हुशार व चुणचुणीत तरुण होता. अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षाला होता. तो हसऱ्या मुखाचा व मनमिळावू होता. शिक्षकांनाही तो प्रिय होता. अभियांत्रिकीच्या मागील तीन वर्षांत त्याने विश्वविद्यालयाचा क्रमांक कधीच गमावला नव्हता. त्याचे वडील सुप्रसिद्ध डॉक्टर असून आई एका चांगल्या बँकेत नोकरी करत होती. एकुलता एक केदार मोठ्या लाडात वाढला होता. त्याला जे हवे असायचे ते त्याचे आई वडील त्याला पुरवायचे. फक्त एक गोष्ट सोडुन; ती म्हणजे त्याच्यासाठी स्वत:चा वेळ. नुकतीच त्याला महागडी स्पोर्ट्स बाईक वाढदिवसाची भेट म्हणून दिली होती. आपल्या केदारचे गोडवे आई बाबा गात होते. त्याच्याकडून सर्वांना खूप अपेक्षा होत्या. परीक्षेला दोन महिने राहिले असतानाच त्याला जर्मनीतल्या एका आंतरराष्ट्रीय आस्थापना चांगल्या पगाराची नोकरीही लागली होती. परीक्षेनंतर तो जर्मनीला जायची तयारी करत होता. कॉलेजमध्येच त्याला जेनी नावाची मुलगी आवडायची. तीही त्याच्याबरोबर पुढचे आयुष्य घालवायची स्वप्ने रंगवायची. पदीक्षेनंतर त्यांच्या घरच्यांनी त्यांचा साखरपुडाही ठरवलेला होता. परीक्षेपासून काही दिवसांआधी त्याला मुख्याध्यापकांनी आपल्या कार्यालयात बोलावून यंदा आपल्या कॉलेजचे नाव साऱ्या महाराष्ट्रात प्रथम यायला हवे असे सांगून त्याच्या कष्टाळू स्वभावाबद्दल त्याचे कौतुक केले होते.

इतके सगळे चांगले असूनही दुधात माशी शिंकलीच. परीक्षेचा दिवस उजाडला. केदार आज रोजसारखा प्रसन्नचित्त वाटत नव्हता. त्याच्या मनावर दडपण दिसत होते. मागील दोन रात्रि न झोपता त्याने अभ्यास केला होता. पेपर सुरु होऊन अर्धा तास झाला असेल तोच केदारला डोळ्यांपुढे काळोख दिसायला लागला. त्याला चक्कर आली व तो बकावरच बेशुद्ध झाला. शिक्षकांनी त्याला उचलून स्टाफरूममध्ये नेले. त्याच्या शुद्धीवर आणण्याचे प्रयत्न केले. कुणी कांदा नाकाशी धरला. त्याच्या वडिलांचे क्लिनिक जवळच असल्याने त्यांना बोलावण्यात आले. पंधरा वीस मिनिटांत तो शुध्दीवर आलाही, पण आता त्याला शिकलेले आठवत नव्हते. त्याच्या डोळ्यांतून निरंतर अश्रू वाहत होते, तो याद करण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता पण त्याचा मेंदू विश्रांतीअभावी थकला होता. तीन तास उलटले. पेपर फारसा कठीण नव्हता. वर्गाबाहेर सगळ्यांची एकच चर्चा होती. केदारचे आता काय होणार? केदारला त्याच्या वडिलांनी गाडीत बसवले. केदारची नजर मात्र जेनीला शोधत होती. ती काही त्याला दिसली नाही.

केदारने स्वतःला आपल्या खोलीत कोंडून घेतले. आई बाबा कोणाशीच तो काही बोलेना. पुढच्या पेपरची तयारी करण्याचे सोडून तो रडत बसला. आयुष्यात हरण्याची चव त्याने याआधी कधी घेतली नव्हती. रात्री त्याने खोलीचे दार उघडले तर बाहेरच्या हॉल मधून त्याच्या कानावर आई-बाबांचे संभाषण पडले. त्यांच्या बोलण्यातून त्याला जाणवले की आजच्या प्रसंगाने त्याचे पुढील आयुष्यच त्याच्याकडून हेरावून घेतले आहे. आजचा पेपर त्याला सोडवता आला नाही, त्यामुळे त्याला पुढच्या सेमिस्टर मध्ये पुनः पेपर सोडविणे गरजेचे आहे. त्याची जर्मनीची नोकरी गेल्यातच जमा होती. आपल्या सहकाऱ्यांना काय सांगायचे हा प्रश्न आईपुढे उभा होता. जेनिबरोबरचा साखरपुडाही आता शक्य नव्हता कारण ती जर्मनीला निघणार होती.

केदारने दुःखी अंतःकरणाने परत दार लावून घेतले. त्याच्या मनाची घालमेल सुरु झाली. त्याने आपल्या मोबाईलवर जेनीशी संपर्क केला. जेनीला त्याने आपली परिस्तिथी सांगितली. जेनीने आधी त्याचे सांत्वन केले. ती त्याच्याशी किती प्रेम करते हे ही सांगितले पण जेव्हा त्याने तिला आपल्यासाठी थांबशील का?असा थेट प्रश्न केला त्यावर तिने उत्तर दिले नाही व काही क्षण दोगेही बोलले नाहीत. जेनीने फोन ठेवला. संपर्क तुटला तोही कायमचा. आत्महत्या करण्यासाठी केदार झेपावणार तोच त्याची नजर त्याच्या स्टडी टेबलवरच्या साईबाबांच्या प्रतिमेवर नजर पडली. त्याच्या जवळच असलेल्या होली क्रॉस वरही त्याची नजर पडली. आत्महत्येचा विचार कुठल्या कुठे पळून गेला. पण मनातील सल मात्र तसाच राहिला. आपल्या आजच्या प्रसंगाचे खापर त्याने देवांवरच फोडले. पुढेचे पेपर त्याने सोडलेच नाही. कॉलेज मध्येही गेला नाही. रोज रात्री झोपण्याआधी तो बाबांचे स्मरण करीत असे. पण हल्ली त्याच्या शेवटच्या वर्षाच्या प्रोजेक्टवर तो रात्रंदिवस काम करीत असे.रात्री झोपताना सुद्धा त्याच्या डोक्यात व ओठांवर साईनामाऐवजी वेगवेगळे फोर्मुले आणि संकल्पनाच होत्या. एकूण तो नकळतच पूर्णपणे त्याच्या गुरूंना विसरत चालला होता. आणि पेपरच्या दिवशी घडलेल्या गोष्टीनंतर तर त्याने देवालाच धारेवर धरले होते.

आई वडिलांना त्याच्यासाठी वेळ देता येत नव्हता.तरीही रात्री ते त्याच्याशी बोलण्याचा व समजावण्याचा प्रयत्न करत होते. वडिलांनी तर त्याच्यासाठी बाहेरून कौन्सेलर ‘मानसतज्ञ’ ठेवला पण तोही त्याला फारसा समजावू शकला नाही. शेवटी परीक्षा संपली. रिजल्ट आला, जेनी वर्गात पहिली आली होती. केदारने अनेकदा तिला फोन करण्याचा प्रयत्न केला पण तिने उचलला नाही. आधी रोज रात्री “गुड नाईट” व सकाळी “गुड मोर्निंग “ दिवसातून अनेकदा “लव यु “ वगैरे वोट्सएपवरचे संदेश ती दोघे एकमेकांना वारंवार करीत असे पण मागच्या काही दिवसात जेनीने संपर्कच तोडला होता. तिचा जर्मनीला जाण्याचा दिवस जवळ आला आणि तिने केदारला विमानामध्ये बसण्यागोदर शेवटचा फोन केला. ती त्याला म्हणाली की त्याच्यासारख्या पळपुट्या भेकड युवकबरोबर आयुष्य घालवणे तिला जमणार नव्हते. त्याच दिवशी केदारने कुणालाही न सांगता घर सोडले. केदारबरोबर काय झाले, त्याने का काय सहन केले ह्याचे साक्षी फक्त दोघेजण होते-  तो स्वत: आणि ज्याला त्याने धारेवर धरले असा त्याचा देव.

अशा ह्या संध्याकाळी आपल्या भूतकाळाच्या कटू आठवणीत हरवलेला केदार आपले पूर्वीचे ते प्रसन्नचित्त प्रतिबिंब डोहाच्या पाण्यात शोधात होता. हवेतला गारवा जाणवत होता. त्याच्या अंगात जराशी कणकणही होती.समोर साईमंदिरातून शहनाईच्या दैवी स्वरलहरी उमटत होत्या. जणू साई केदारला आपल्यापाशीच बोलावत होते. पण केदार मात्र आपल्या गुरूंना विसरून बसला होता. इतक्यात त्याच्या खांद्यावर उबदार हाताचा स्पर्श त्याला जाणवला. इतक्या दिवसात आपली साधी विचारपुसही कुणी केली नव्हती पण आज अचानक कुणी तरी आले म्हणून त्याने वळून पहिले तर एक वृध्द व्यक्ती त्याला दिसला. आपण पांघुरलेली मऊशार उबदार शाल त्याने केदारच्या भोवती गुंडाळली. आपल्या हातातली पुरचुंडी उघडून त्यातून साजूक तुपाच्या दोन पूरणपोळ्या त्याने केदारपुढे धरल्या व म्हणाला- “तू कोण कुठून आला आहेस  हे विचारण्याआधी मी आणलेल्या ह्या पूर पोळ्या खाऊन घे. खूप थकलेला दिसतोयस. घे.” केदारने त्या पुरणपोळ्या खाल्ल्या. त्याने इतक्या रुचकर पोळ्या कधीच खाल्ल्या नव्हत्या. त्या म्हातारबाबाने त्याला पाणी दिले.पाणी पिऊन व जरासा सावरून त्याने त्या वृध्द बाबांना पहिले. त्यांचा चेहरा त्याला कुठे तरी पहिला असल्यासारखा वाटला.चार दिवसामागे तो असाच भटकत एका इगर्जीच्या आवारात कोसळला होता तेव्हा अशाच एका ख्रिस्ती माय-लेकाने त्याला पाव भरविला होता. केदारने म्हातारबाबाला आपली कहाणी ऐकवली. पण जेनीबद्दल मात्र त्याने त्यांना काहीच सांगितले नाही. बोलताना नकळत त्याच्या डोळ्यांना धार लागली कदाचित जेनीच्या आठवणीने असेल. म्हातारबाबांनी त्याच्या कसनुश्या वाढलेल्या केसांवरून हात फिरविला. त्या मायेच्या स्पर्शाने केदारचे मन सुखावले.

 केदारचे डोके आपल्या मांडीवर घेऊन समजवणीच्या स्वरात तो म्हातारबाबा म्हणाला- “ पोरा एका परीक्षेत हरलास म्हणून आयुष्याची माती करायला निघालायस?.अरे इथे जीव वाचिवण्यासाठी लोक आटापिटा करता. आयुष्यात पुढे तुला ह्याहीपेक्षा खडतर परीक्षांना सामोरे जावे लागेल. जेव्हा जन्मानंतर बाळ आईच्या कुशीत पहिला टाहो फोडतो त्याच वेळी त्याच्या जीवनातील परीक्षा सुरु होतात. जन्मलेल्या शिशुला सुद्धा श्वास घेण्यापासून टाहो फोडण्याच्यापर्यंतच्या परिक्षेला सामोरे जावे लागते. अनेकदा आपल्याला अपयश येते. पण अपयश ही यशाची पहिली पायरी आहे हे विसरून कसे चालेल? अपयश चाखलेल्यांनाच  यशाचे खरे सुख कळते. प्रयत्न करणे इतकेच आपल्या हाती आहे. मोठमोठे डॉक्टर सुद्धा शस्त्रक्रियेत कधीतरी अपयशी होतातम्हणून का ते आपली सेवा सोडून देतात? आपल्या आयुष्यात जे काही घडते ते परमेश्वराच्या संमतीनेच घडते. वाईट घडण्यामागचा हेतू आपल्याला शिक्षा देणे हा नसून आपल्याला काही नवीन शिकविणे असा असतो. एक लक्षात ठेव आपल्या पूर्व जन्माच्या कर्माखातर अथवा आपण स्वतः केलेल्या हलगर्जीपणामुळे आपण कधी असे प्रसंग अनुभवतो पण त्याही प्रसंगी आपल्या कर्माचा एकमेव साक्षी असा ईश्वर आपल्या बरोबर असतोच. फक्त आपल्या डोळ्यांवर पंचविकारांची पट्टी बांधलेली असल्याने तो आपल्याला दिसत नाही. तुला मिळालेल्या नोकरीत पुढे कदाचित तुझे हित नव्हते म्हणूनच ती गेली असेल. कदाचित ह्याहूनही चांगली दुसरी नोकरी तुझ्यासाठी योजलेलीं असेल. आणि त्या मुलीबद्दल सांगायचे झाल्यास जी मुलगी आपल्याला समजून घेत नाही, आपली समजूत घालू शकत नाही, जिला अपयशी लोक आवडत नाही , ती पुढे जर तुला अपयश आले तर तुझी साथ देईलयाची खात्री तू देऊ शकला असतास? ज्या आई वडिलांनी तुला मागची 22 वर्षे माया केली त्या मायबापचा साथ तू  जिला जेमतेम तीन चार वर्षे ओळ्खतोस अशा पोरीसाठ सोडलास? मातृ देवो भव पितृ देवो भव हे विसरलास? ज्या गुरूंची भक्ती तू करत होतास त्या गुरूलाही विसरलास?शेवटपर्यंत श्रद्धेने आणि धैर्याने लढा देणे हा त्यांचा संदेश विसरलास? पोरा.......भानावर ये परत फिर.”

केदार एकदम स्तब्ध झाला. जेनिबद्दल त्याने म्हातारबाबांना काही सांगितलेच नव्हते. त्याचप्रमाणे आपण ज्या गुरूंची भक्ती करत होतो त्यांच्याबद्दल ह्यांना कसे कळले ह्यचेही आश्चर्य त्याला झाले. न राहवून त्याने म्हातारबाबांना ह्याबद्दल विचारले. म्हातारबाबांनी स्मित हास्य करत त्याच्या डोळ्यांत पहिले. केदारला ती नजर ओळखीची वाटली कदाचित हीच नजर त्याने आधीही कुठेतरी पाहिलेली होती. कदाचित त्याला भेटलेल्या त्या ख्रिस्ती माय् लेकांमध्ये? की त्याला अंगात सणसणता ताप असताना दवाखान्यात नेऊन त्याचावर मोफत उपचार केलेल्या त्या वृध्द मौलवीसाहेबांमध्ये? भ्रमिष्टासारखी त्याची अवस्था झाली. म्हातारबाबांनी त्याला गोंजारले व म्हणाले –“ पोरा आता माझ्या निद्रेची वेळ झाली आहे.मला जायला हवे. त्या मंदिरातच आज  मी आसरा घेतलाय. तुला तिथे येण्याचा मी मात्र आग्रह करणार नाही बरे! तू मात्र उद्याच परत फिर”. म्हतारबाबांनी आपल्या जवळील ५०० रुपये त्याच्या खिशात कोंबले.व म्हणाले “ लेका कधीहि दुखले खुपले म्हणून रडत बसू नको. मी आहे सोबतीला तुझ्या... सदैवच“ असे बोलून म्हातारबाबा चालायला लागले. त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीला पाहून केदार दचकला. म्हातारबाबा दुसरे तिसरे कोणी नसून साईबाबाच असल्याची त्याची खात्री पटली. देवळात आता भक्त मंडळींची रहदारी वाढली होती. शेजारतीला (बाबांच्या निद्रेआधीची आरती) प्रारंभ होणार होता. बाबा पायरी चढत होते. त्यांनी शेवटचा कटाक्ष केदारवर फेकला. साक्षात अनंतकोटी ब्रह्मांडनायक साईबाबा त्याच्यासमोर उभे होते. बाबांच्या मागून पायरी चढून अनेक भक्त जात होते पण बाबांकडे कुणीच पाहत नव्हते.कदाचित त्यांना ते दिसंत नव्हते.

केदारकडे पाहून प्रेमळ स्मित करत साईबाबा म्हणाले- “जर तू श्रद्धा व सबुरी ठेवली असतीस तर तुझा प्रवास इथपर्यंत झालाच नसता .तुझ्या मनातील अंधार आणि माझ्याबद्दलचा राग दूर करण्यासाठी मलाही तुझ्यामागे सावलीप्रमाणे हिंडावे लागले. बाळा तू एकच हाक मारली असतीस तर हा साई तुझ्यासाठी धावत आला असता. तू स्वतःभोवती न्यूनगंडाची भिंत अशा पध्दतीने रोवली होतीस की मला तुझ्या पर्यंत पोचताच येत नव्हते. लक्षात ठेव आयुष्य म्हणजे एक रणांगण आहे. येथे प्रत्येक क्षणी, पावलोपावली कटू प्रसंग व निखारे असतीलच. पण जो कोणी धैर्याने या रणांगणाची वाटचाल करेल तोच खरा योद्धा ठरेल. स्वतः देव असूनही येशू ख्रिस्तांनी दुसऱ्यांसाठी दुःख यातना भोगल्या. प्रभू रामचंद्रांनी आपल्या राजधर्मासाठी आपल्या प्रिय पत्नीला वनवासाला पाठवले. भगवान बुद्धांनी समाजाच्या उद्धारासाठी ज्ञान अर्जन करण्यासाठी आपल्या सुखी संसारावरून नांगर फिरविला. पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांनीही गांधारीच्या शापाची पूर्तता करण्या हेतूने जरा ह्या पारध्याच्या करवी आपला वध करवून घेतला. मी स्वतः भक्तांची दुखणी आपल्या अंगी घेऊन दुसऱ्यांना दुखःमुक्त करतो. आयुष्यात आपण काय मिळविले यापेक्षा आपण दुसऱ्यांना काय दिले ह्याचे महत्व अधिक आहे. तू सदाचाराने वाग, आपल्या आयुष्याची पुनः नव्याने सुरुवात कर, नव्या जोमाने अभ्यास कर. माझी अकरा वचने विसरलास? मी तुझ्यासोबत असताना भीती कसली?. सबका मलिक एक. तुझे कल्याण असो.” असे म्हणून साई देवळात गेले.

रात्र झाली होती. देवळातून घंटानाद ऐकू आला व पाठोपाठ आरतीचे बोल केदारच्या कानी पडले- “ रहम नजर करो अब मोरे साई….तुम बिन नही कोई माँ बाप भाई।…” आणि नकळतच केदारची पावले देवळाकडे वळली.


ओम साई राम